विशेष भर असलेली क्षेत्रे

शहर विकास
सत्यजीत तांबे हे टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाचा पुरस्कार करत आले आहेत. केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरता विकास मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील इतर शहरेदेखील राहणीमान, संधी आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सक्षम करण्यासाठी ते जोरदार आवाज उठवत आले आहेत.
छोट्या शहरांमधून होणारे स्थलांतर आणि त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये होणारी गर्दी, अपुरे वेतन आणि निकृष्ट जीवनमान यासारख्या छोट्या शहरांतील तरुणांना सहन कराव्या लागणाऱ्या दैनंदिन समस्यांवर ते सातत्याने प्रकाश टाकत आले आहेत. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहराचा विकास या विषयावरील “सिटिझनविल” या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. हे पुस्तक Amazon वर ‘नंबर 1 बेस्टसेलर’ पुस्तक बनले आहे. हे पुस्तक तुम्ही खालील लिंक द्वारे मागवू शकता
तरुणांचे प्रश्न
अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्या सत्यजीत तांबे यांचे तरुणांशी घट्ट नाते असून तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा यांची त्यांना चांगली जाणीव आहे. युवकांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्यावर त्यांचा भर आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा मतदारसंघांमधून विक्रमी संख्येने निवडून आलेले तरुण हा त्याचा पुरावा आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचे राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ राष्ट्रीय नेत्यांनी कौतुक केले आहे. तरुण नेत्यांना, उद्योजकांना प्रेरित करणे, प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या समस्या योग्य त्या व्यासपीठांवर मांडण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे यातून त्यांनी तरुणांमध्ये त्यांनी आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ते ‘गेट इन्स्पायर्ड विथ सत्यजीत तांबे’ या लोकप्रिय टॉक शोचे होस्टही आहेत

Contribute or help save a pet
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Pulvinar dapibus leo. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.