सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अगदी तळागाळापासून आपल्या कामाला सुरुवात करून ते गेल्या 23 वर्षांपासून संघटनात्मक आणि निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले असून ते दोनदा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. शहर विकास, युवा समस्या आणि महिला सक्षमीकरण यावर त्यांचा विशेष भर असून आणि दर्जेदार शिक्षण, सुलभ आरोग्य सेवा आणि उद्योजकतेला ते प्रोत्साहन देतात. लोकप्रतिनिधींच्या जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचे ते पुरस्कर्ते असून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कामाची जास्तीत जास्त माहिती मतदारसंघातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
with Satyajeet Tambe
YouTube