सत्यजीत तांबे हे टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाचा पुरस्कार करत आले आहेत. केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरता विकास मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील इतर शहरेदेखील राहणीमान, संधी आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सक्षम करण्यासाठी ते जोरदार आवाज उठवत आले आहेत.
अधिक माहिती
अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्या सत्यजीत तांबे यांचे तरुणांशी घट्ट नाते असून तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा यांची त्यांना चांगली जाणीव आहे. युवकांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्यावर त्यांचा भर आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा मतदारसंघांमधून विक्रमी संख्येने निवडून आलेले तरुण हा त्याचा पुरावा आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचे राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ राष्ट्रीय नेत्यांनी कौतुक केले आहे. तरुण नेत्यांना, उद्योजकांना प्रेरित करणे, प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या समस्या योग्य त्या व्यासपीठांवर मांडण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे यातून त्यांनी तरुणांमध्ये त्यांनी आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ते ‘गेट इन्स्पायर्ड विथ सत्यजीत तांबे’ या लोकप्रिय टॉक शोचे होस्टही आहेत
अधिक माहिती
त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात हे महिलांच्या समान हक्कांसाठी आग्रही असलेले सहकार चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारी नेते होते. त्यांच्या सहवासात पुरोगामी वातावरणात वाढलेले असल्याने सत्यजीत तांबे देखील ‘नारी शक्ती’च्या हक्कांबाबत आग्रही आहेत. त्यांच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आजवरच्या सर्वाधिक युवती संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर आल्या होत्या. राज्यकारभारात महिलांच्या समान प्रतिनिधित्वासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे आणि अधिकाधिक जागांवर महिलांना नेतृत्वाची संधी द्यायला हवी, असे त्यांचे मत आहे.
अधिक माहिती