About Us

सत्यजीत तांबे
आमदार नाशिक पदवीधर

सत्यजीत तांबे यांचे ध्येय म्हणजे पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांवर आधारित सुशासन घडवणे. त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्रबिंदू गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा, युवक आणि महिला सक्षमीकरण, उद्योजकतेला चालना तसेच शाश्वत शहरी विकास हे आहेत.जयहिंद लोकचळवळ आणि विधिमंडळातील कार्याच्या माध्यमातून ते नागरिकाभिमुख, तंत्रज्ञानाधारित आणि लोकांच्या गरजांशी सुसंगत असे सुशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

राजकीय प्रवास

सत्यजीत तांबे यांचा राजकीय प्रवास विद्यार्थिदशेतच सुरू झाला. विद्यार्थी असताना त्यांनी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. NSUI मध्ये त्यांनी महाराष्ट्र सचिव, सरचिटणीस तसेच नंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. अवघ्या २४व्या वर्षी ते अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा परिषदेत निवडून आले आणि त्या वेळेस सर्वात तरुण सदस्यांपैकी एक ठरले. २००७ ते २०१७ या कालावधीत त्यांनी सलग दोनवेळा जिल्हापरिषदेच्या कार्यकाळाचे काम पाहिले. या काळात ग्रामीण विकास, पाणी संवर्धन, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी व्यापक काम केले.
२०१८ ते २०२२ या कालावधीत ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. या काळात तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा विशेष भर राहिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक नव्या नेतृत्वाला स्थानिक तसेच राज्यस्तरीय राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली. २०२३ साली त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणूक लढवली आणि विजयी झाले. या निवडणुकीमुळे वडिलांचा वारसा पुढे नेत प्रगतिशील बदलाच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक जीवनात सक्रिय कार्य सुरू ठेवण्यात ते यशस्वी झाले.

सत्यजित तांबे
आमदार नाशिक पदवीधर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य