प्रमुख उपक्रम

सत्यजीत तांबे यांनी युवक, शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच प्रगतशील उपक्रमांना चालना दिली आहे.
त्यांचे कार्य प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, डिजिटल सक्षमीकरण आणि समुदाय विकास यांवर केंद्रित आहे.
युवा माहिती केंद्रे

धुळे, जळगाव, नंदुरबार येथे युवा माहिती केंद्रे सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. नाशिक व अहिल्यानगर मध्ये केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या केंद्रांद्वारे युवकांना शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेबाबत मार्गदर्शन दिले जाते.

यूनोव्हेशन सेंटर, ब्राह्मणगाव

ब्राह्मणगाव येथे "यूनोव्हेशन सेंटर" या संकल्पनेची सुरुवात केली. या माध्यमातून युवकांना शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेसाठी आवश्यक संसाधनांचा एकत्रित लाभ मिळतो.

युथोत्सव – नोकरी, उद्योजकता आणि कौशल्य विकास:

"आय लव्ह संगमनेर" ही चळवळ, संगमनेरचा अभिमान असलेल्या अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. शिक्षण, साहित्य, पर्यटन, उद्योग, कला, क्रीडा आणि आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांत संगमनेरकरांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम कार्यरत राहणार आहे.

शिक्षण व शिक्षक कल्याण

शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा: विधान परिषदेत अध्यापक व बिगर-अध्यापक कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय बिल थेट कॅशलेस पद्धतीने मंजूर करण्याची मागणी करून आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले.

भाषा व सांस्कृतिक विकास

कुसुमाग्रज स्मारक येथे मराठी भाषा अध्ययन केंद्र: नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारक येथील मराठी भाषा अध्ययन केंद्राचे आधुनिकीकरण व डिजिटलायझेशन करण्यासाठी आपल्या विधान परिषद निधीतून रु. ५० लाख मंजूर केले. या उपक्रमाद्वारे मराठी साहित्य वारसा जतन व संवर्धन करण्याचे कार्य सुरू आहे.

क्रीडा विकास

“वन महाराष्ट्र वन गोल” – STAIRS फाउंडेशनमार्फत उपक्रम STAIRS फाउंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष म्हणून “वन महाराष्ट्र वन गोल” या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आणि त्यानंतर राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा घेतल्या जातात. या माध्यमातून ग्रामीण पातळीवर क्रीडेला चालना दिली जात आहे.

शेती व ग्रामीण युवक

राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार जयहिंद मूव्हमेंटच्या माध्यमातून कृषी व संबंधित क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा शेतकरी व ग्रामीण उद्योजकांना सन्मानित करण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली.